Monday, 28 May 2018



थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला
थायरॉंइड म्हणजे काय ?

थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल अचूक माहिती आहे. डाईबीटीस, कॅन्सर या सारख्या रोगान बद्दल जेवढी जनजागृती झाली आहे त्या तुलनेने ह्या रोगा ची फार कमी माहिती लोकांना आहे. त्या मुळे ह्या रोगाचे प्रमाण भारतात वाढले आहे.

Tuesday, 8 May 2018

भारत देश व शेजारील राष्ट्र यांच्या सीमारेषा

*भारताच्या सीमा*



*भारताची एकूण सीमा* (Border) सुमारे १५,१०६.७ किमी असून ८ देश सीमेशी संलग्न आहेत. ते देश पुढीलप्रमाणे –

१) *अफगाणिस्तान* : अफगाणिस्तानशी १०६ किमी असलेल्या सह्सामायिक रेषेला ‘ड्युरांड लाईन’ म्हणून ओळखले जाते. हे एकूण सीमेशी प्रमाण ०.५२% इतके आहे. जम्मू-काश्मीर हे एकमेव राज्य अफगाणिस्तानच्या रेषेशी सह्सामायिक आहे.

बदली पात्र मित्रांचे अभिनंदन

आज आंतर जिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षक मित्रांचे खुप खुप खुप अभिनंदन,

Sunday, 6 May 2018

भारतीय क्षेपणास्त्रे

***भारताची ‘मिसाईल पॉवर’ -----

🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀

गेल्या आठवड्यात भारताने पृथ्वी-2 आणि अग्नि-1 या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या केल्या.

 एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते.

Saturday, 5 May 2018

राजर्षी शाहू महाराज




आज शाहू महाराजांचा स्मृतिदिन.
 त्यांना विनम्र अभिवादन.
🙏🏻🙏🏻🙏🏻

जातीभेदाविरुद्ध लढा:

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला थायरॉंइड म्हणजे काय ? थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल...