Thursday, 19 April 2018

नवीन उपगह आरएनएसएस 1 चे यशस्वी प्रक्षेपण

ISRO ने ‘IRNSS-1I’ सुचालन उपग्रह अवकाशात पाठवला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 12 एप्रिलला श्रीहरिकोटाच्या अंतराळ केंद्रावरून PSLV-C41 प्रक्षेपकाद्वारे ‘IRNSS-1I’ उपग्रह अंतराळात यशस्वीरीत्या सोडण्यात आले आहे.


IRNSS-1I उपग्रह हा भारताच्या ‘NavIC’ नावाच्या स्वदेशी सुचालन प्रणालीचा एक भाग आहे.

IRNSS-1I बाबत

1,425 किलोग्राम वजनी ‘IRNSS-1I’ सुचालन (दिशादर्शक) उपग्रह उप-भौगोलिक समांतर कक्षेत (सब-GTO) स्थापन करण्यात येत असलेल्या ‘भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणाली (IRNSS)’ प्रकल्पाचा नववा उपग्रह आहे.

हा उपग्रह IRNSS-1H ची जागा घेणार, ज्याचे प्रक्षेपण 31 ऑगस्ट 2017 रोजी अयशस्वी झाले होते.

याचा कार्यकालावधी 10 वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे.

‘NavIC’ प्रणाली

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भारताची स्वत:ची GPS प्रणाली सुरू करणार आहे. ही प्रणाली ‘इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम (IRNSS)’ किंवा ‘NavIC’ सेवा या नावाने ओळखली जाईल.

IRNSS दोन प्रकारच्या सेवा प्रदान करणार - सर्व वापरकर्त्यांसाठी स्टँडर्ड पोजिशनिंग सर्व्हिस (SPS) आणि केवळ अधिकृत वापरकर्त्यांसाठी रेस्ट्रीक्टेड सर्व्हिस (RS).

‘NavIC’ प्रणाली ही ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GPS) सेवेप्रमाणेच आहे. भारताकडून ‘NavIC’ या नावाने ‘भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणाली (IRNSS)’ उभारण्यासाठी एकूण सात उपग्रहांचा वापर केला जाणार आहे. सात सुचालन उपग्रहांमधील पहिला IRNSS-1A उपग्रह तीन रुबिडियम अटॉमिक क्लॉक बंद पडल्यामुळे निष्प्रभावी झाले आहे.

ही प्रणाली भारताच्या सर्व बाजूंनी सुमारे 1500 किलोमीटरच्या सीमेच्या आत कार्य करणार. ही प्रणाली वापरकर्त्या संस्थेला रस्त्यावर आणि समुद्रात त्यांचे वाहन चालविण्यासाठी योजनेची आखणी करण्यास आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करणार.

आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडनार्‍या मच्छीमारांना याद्वारे सावध केले जाऊ शकते आणि लोकांना त्यांना आवश्यक असलेला पत्ता शोधण्यास मदत होऊ शकणार. शिवाय दूरसंचार आणि पॉवर ग्रीड कार्यामध्येही याची मदत होऊ शकते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पाहिल्यादा प्रक्षेपित करण्यात आला. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रायान-1’ मोहीम यशस्वी झाली. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.

No comments:

Post a Comment

थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला थायरॉंइड म्हणजे काय ? थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल...