Thursday, 26 October 2017

राजगड

राजगड

गडांचा राजा आणि राजांचा गड! ‘राजगड हा अतिशय उंच आहे. त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांत श्रेष्ठ आहे. त्याचा घेर बारा कोसांचा आहे. त्याच्या मजबुतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही

गडांचा राजा आणि राजांचा गड!

‘राजगड हा अतिशय उंच आहे. त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांत श्रेष्ठ आहे. त्याचा घेर बारा कोसांचा आहे. त्याच्या मजबुतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही. या डोंगरदऱ्यांतून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे कुणीही फिरकू शकत नाही..’ स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाबरोबरच्या साकी मुस्तैदखान याने शिवरायांच्या राजगडाबद्दल ‘मासिरे आलमगिरी’ या ग्रंथात केलेले हे वर्णन! स्वकीयांनी केलेल्या कौतुकापेक्षा शत्रूने व्यक्त केलेले हे भयच राजगडची खरी ओळख करून देते. हीच ओळख ठेवून कानंदी अन् गुंजवणीच्या खोऱ्यात उतरावे आणि या गडाचे भारदस्त, पुरुषी, रांगडे रूप डोळय़ांत सामावून घ्यावे!

खरेतर राजगडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस असे. कुठल्याही ऋतूत पाहावे असे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो. पण त्यातूनही वर्षां ऋतूने श्रावण-भाद्रपदात प्रवेश केला, की हिरवाईत बुडालेला हा गड सोनकी-तेरडय़ाच्या रानफुलांनी जणू नव्या नवरीप्रमाणे सजू पाहतो. पाऊस, ढग-धुके आणि हिरवाई-रानफुलांच्या सहवासात या राजगडाचा प्रत्येक कोन, दृश्य बदलून जातो. वास्तूंचे रूप खुलते. अशा वर्षांकाळी एकदा तरी या गडावर यावे आणि त्याचे होऊन जावे…

थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला थायरॉंइड म्हणजे काय ? थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल...