Monday, 28 May 2018



थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला
थायरॉंइड म्हणजे काय ?

थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल अचूक माहिती आहे. डाईबीटीस, कॅन्सर या सारख्या रोगान बद्दल जेवढी जनजागृती झाली आहे त्या तुलनेने ह्या रोगा ची फार कमी माहिती लोकांना आहे. त्या मुळे ह्या रोगाचे प्रमाण भारतात वाढले आहे.


थायरॉंइड म्हणजे नक्की आहे तरी काय ?

आपल्या शरीरात भरपूर एंडोक्राइन ग्लैंड्स (अंत: स्रावी ग्रंथि) असतात. ज्यानच काम असत हार्मोन्स तयार करण. त्या मध्ये थायरॉंइड हा एक आहे तो आपल्या मानेच्या मध्य भागी आढळतो. थायरॉंइड या मध्ये दोन प्रकारचे हार्मोन्स येतात T3 आणि T4 ,जे आपल्या शरीराचा मेटाबॉलिज्म नियंत्रित करतो. निरोगी माणसामध्ये ह्या हार्मोन्से प्रमाण नियंत्रित असते तर या उलट रोगी माणसामध्ये ह्याचे प्रमाण कमी किंवा जास्त होते यालाच थायरॉंइड डीसऑर्डर असे म्हणतात. थायरॉंइड हार्मोन्स ह्याचा परिणाम शरीरावर सर्वत्र म्हणजेच आपल्या हृदयावर, मेंदूवर आणि पचन क्रियेवर होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला थायरॉंइडची व्याधी होते तेव्हा आपल्या शरीरात असणाऱ्या हार्मोन्स नियंत्रित केल्या जाणाऱ्या पीयूषिका आणि थायरॉइड ग्रंथिन मध्ये अडथळे निर्माण होतात.

थायरॉंइड डीसऑर्डर म्हणजे काय ?

थायरॉंइड ग्रंथिन मधून निघणाऱ्या T3 आणि T4 हार्मोन्स चे प्रमाण कमी आणि जास्त होणे म्हणजेच थायरॉंइड डीसऑर्डर  होय.

थायरॉंइड डीसऑर्डर चे प्रकार किती आहेत ?

जागरूक थायरॉइड (हायपरथायरॉइडिझम) :

रक्तात T3 आणि T4 प्रमाण अधिक असल्यास जागरूक थायरॉईड (हायपरथायरॉइडिझम) होतो.


सुप्त थायरॉइड (हायपोथायरॉइडिझम) :

रक्तात T3 आणि T4 प्रमाण कमी असल्यास सुप्त थायरॉइड (हायपोथायरॉइडिझम) होतो.


थायरॉंइड ची लक्षण कोणती आहेत ?

शरीराचे कमी तापमान

जलद किंवा संथगतीने चालणारी नाडी

असामान्यपणे कमी किंवा उच्च रक्तदाब

असामान्यपणे मोठी किंवा लहान मान किंवा मानेतील गाठ

घोगरा, कर्णकटू आणि कठोर आवाज

खूप तहान किंवा भूक     

आहार किंवा व्यायाम यामध्ये बदल केला नाही तरी लक्षात येण्याजोगा वजनातील बदल (वाढणे किंवा कमी  होणे)

इतरांना थंडी वाजत असते तेव्हा गरम होणे किंवा इतरांना गरम होत असते तेव्हा थंडी वाजणे

हृदयाचे ठोके

विचित्र पद्धत किंवा लय

बद्धकोष्ठता किंवा अतिसार

थकवा

अशक्तपणा

No comments:

Post a Comment

थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला थायरॉंइड म्हणजे काय ? थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल...