Monday, 2 October 2017

मतदारांनो आपले मतं विकू नका!

मतदारांनो आपले मतं विकू नका!

    ग्रामपंचायतिच्या निवडणुका जाहिर झाल्या तशे ग्रामिण भागातिल वातावरण तापू लागले आहे.पारावर,चावडीवर व चौकाचौकात गप्पांचे फड रंगु लागले आहेत.'गावचा सरपंच कोण होणार? आमदार -खासदारकिच्या निडणूकिपेक्षाही ग्रामपंचायतिच्या निवडणुकिला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.गावा गावात निडणुकिचा जोर शिगेला पोहचला आहे.याला कारण म्हणजे या वर्षिच्या ग्रामपंचायतिच्या निवडणुक खऱ्या अर्थाने वेगळ्या आहेत.एक तर सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतून होणार आहे आणि गावातिल जनतेचा कौल कोणत्या नेत्याच्या व पार्टीच्या बाजूने आहे हे समजणार आहे. ग्रामपंचायतिला सक्षम करण्यासाठी व ग्रामिण भागाचा विकास करण्यासाठी  करोडो रुपये अनुदान मिळणार आहे.यामुळे गावाचा कारभारी आपण व्हावे यासाठी गावातल्या पुढाऱ्यांनी चंग बांधला आहे.हौसे नवसे गुडघ्याला बासिंग बांधून तयार आहेत. सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतुन होणार असल्यामुळे गावातिल जनता कोणाच्या बाजूने आहे याचा निकाल लागणार आहे.यामुळे कधि नव्हे येव्हढे महत्व  यावर्षि निवडणुकिला  प्राप्त झाले आहे.

        गावातिल जनता आपल्याच बाजूने आहे' हे दाखविण्याची नामी संधि या निमित्ताने गावच्या पुढाऱ्यांना व राजकिय पक्षांना मिळणार आहे. यामुळे साम,दाम दंड,भेद या ञिसुञीचा सर्रास वापर होणार आहे.ओल्या पार्ट्याचे तर गावा गावात 'धाबे' दणानले आहेत,हौसफुल आहेत.गावा गावातिल युवा नेते,दादा,भैया,आण्णा,मामा सगळे सरपंच हेण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.राजकिय पक्ष,विकास आघाड्या,परिवर्तन पँनल ,आमुक तमूक सगळे गाव ताब्यात घेण्यासाठी मतदारांच्या पाया पडू लागले आहेत.या निवडणुकिच्या हंगामात खरी कसोटी लागणार आहे ती म्हणजे मतदारांची.नेमक मतं द्याव कुणाला? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.गावची निवडणुक म्हणजे 'घर एक पार्ट्या आऩेक' असा प्रकार असतो.एका पार्टीत दादा तर दुसऱ्या पार्टीत ताई,एकिकडे बाप तर दूसरिकडे पोरगं, एकिकडे मावशी तर दुसरिकडे मामी,एका पँनलमध्ये भावकी तर दूसऱ्या पँनलमध्ये नातेवाईक, नेमकं मतदान करावे तरि कुणाला? हा यक्ष प्रश्न मतदारांसमोर असतो.मग मतदान जवळ येईल तशे सुरु होतात हेवे दावे,राडे,फोडा फोडी अन पळवा पळवी.घरा घरात आणि गल्लोगल्लीत भांडणं. फुकटचा तमाशा,रोज बिना तिकीट लोकांचे मनोरंजन.शेंबड्या पोरापासुन तर टेकलेल्या म्हताऱ्या पर्येंत सगळीकडे राजकारण,'हा' कोणत्या पार्टीचा 'तो' कोणत्या पार्टीचा.  गावात चार चौघात बोलताना आनेक नजरा संशयाच्या नजरेने पाहत असतात.मिञ,नातेवाईक इत्यादींसोबत बोलण्याची तर चोरीच झाली आहे.बोलताना दिसला की हा फुटलारे! याच्याकड जरा लक्ष ठेवा.या निवडणुकिच्या काळात माणसांकडे माणूस म्हणून पाहिलच जात नाही.आपल्या पार्टीचा आशेल तर तो आपला नाहीतर विरोधक! मग तो सख्खा भाऊ का आशेना.गावातिल पुढाऱ्यांना हेच हवे असते .आपसात भांडण लावायची अन आपली पोळी भाजायची. पार्टीला मत नाही केले तर याचा बांध फोड त्याचा बांध फोड.घराघरात भांडण लावून द्यायची. परंतु जनतेने जागृत असायला हवे.निवडणुका येतील व जातिल आपले नातेवाईक,मिञ भावकीशि उगाच वैर घेऊ नका.जात पात धर्म पंथ या गोष्टी घरापुरत्या मर्यादित ठेवा.सोशल मिडीयांसारख्या धारदार अस्ञाचा विधायक समाजपयोगी कार्यासाठी वापर करा.तुमची कमजोरीचा गैरफायदा घेऊन गावचे पुढारी तुम्हाला मोठ्या संकटात ढकलत आहेत.

No comments:

Post a Comment

थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला थायरॉंइड म्हणजे काय ? थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल...